शहर होणार स्मार्ट, जालनारोडवर आणखी चार उड्डाणपुल, तीन भुयारी मार्ग
औरंगाबाद , दि. 18 - शहरातील सर्वाधिक वर्दळीचा जालनारोड रंद करून फुटपाथसह दहापदरी करून शहराला स्मार्ट सिटीचा लुक देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जालना रोडवर चार नवीन उड्डाणपूल आणि तीन भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत. याबरोबरच बीड बायपास रस्त्यावरही तीन उड्डाणपूल उभारले जाणार असून जालना रोड आणि बीड बायपास यांना दोन उड्डाणपुलांनी जोडण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बैठकीत घेतला आहे.
रस्त्याच्या विकासासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे 750 कोटी रुपये खर्च करून केल्या जाणार्या या कामांचे मराठवाडा विकास मंडळात झालेल्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. खा. चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी निधी पांडे, महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यू. जे. चामरगोरे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अलोक वार्ष्णेय यांच्यासह रेल्वे, एसटी, लष्कर, महावितरण, बीएसएनएल, एमआयडीसी, सिडको या यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकार्यांची यावेळी उपस्थित होते.