Breaking News

खालापूर-सिंहगड 20 किमीचा भुयारी मार्ग

मुंबई, दि. 23 - मुंबई-पुणे महामार्गावर वाढत असलेले अपघात आणि वाहतूक लक्षात घेऊन या मार्गावर खालापूर ते सिंहगड इन्स्टिटयूट दरम्यान 20 किमीच्या परिसरात एक नवीन बोगदा बांधला जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
आमदार सुभाष पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर शिंदे यांनी सांगितले की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी राज्य सरकारमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरडी कोसळू नयेत म्हणून हायटेन्साईल वायर, ब्रायफेन वायर वापरून दुभाजक ओलांडून होणा-या अपघातांना प्रतिबंध करण्यात येत आहे. येत्या सहा महिन्यांत या द्रुतगती मार्गावर ई-टोल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसमवेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.