Breaking News

मोदी मंत्रिमंडळात 24 मंत्री गुन्हेगार

नवी दिल्ली, दि. 11 - केंद्रातील मोदी सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. आता एकूण 78 मंत्री असणार्‍या मोदींच्या जंबो मंत्रिमंडळातील 24  मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले आहेत. तर एकूण 72 मंत्री कोट्यधीश आहेत. नव्या मंत्र्यांमध्ये मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेलेले व सध्याचे पर्यावरणमंत्री  अनिल माधव दवे यांची संपत्ती सर्वांत कमी आहे.