मरेला दुसर्यादा विंबल्डनचे विजेतपद
लंडन, दि. 11 - विंबल्डनचे जेतेपद जिंकत मरेने 2013 नंतर दुसर्यांदा ही स्पर्धा जिंकली. मेरेच हे कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. निर्णायक लढतीच्या वेळी जवळपास एकतर्फी पाठिंबा असलेल्या मरेने मोक्याच्या वेळी खेळ उंचावत बाजी मारली
आणि त्यानंतर ‘अँडी अँडी’चा जयघोष जास्तच उंचावत गेला. मरे विजेतेपदाचा आनंद साजरा करीत असताना स्टेडियममधील प्रत्येक जण टाळ्या वाजवत आपल्या हीरोचे कौतुक करीत होते.
स्कॉटिश मरेने सहाव्या मानांकित राओनिचचे आव्हान 6-4, 7-6 (7-3), 7-6 (7-2) असे परतवले आणि ही स्पर्धा दोनदा जिंकणारा मरे हा फ्रेड पेरी यांच्यानंतरचा दुसरा ब्रिटिश टेनिसपटू ठरला.