Breaking News

वडागळे‘शिवशक्ती श्री 2016’ तर कृष्णा पालवे ‘बेस्ट पोझर

अहमदनगर, दि. 18 - नुकत्याच शिवशक्ती जेन्टस् व लेडिज फिटनेसच्यावतीने व अ.नगर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डिंग असो.च्या मान्यतेने, सिव्हील हडको येथे शिवशक्ती फिटनेस क्लबमध्ये घेतल्या गेलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रेमदान हडको येथील अमित विजय वडागळे हा शिवशक्ती श्री 2016 चा मानकरी ठरला. त्याला रोख 2 हजार रुपये, मानाचा बेल्ट, आकर्षक ट्रॉफी, सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले. ‘बेस्ट पोझर श्री 2016’ चा मानकरी गणेश चौक, सिव्हील हडको येथील कृष्णा शाम पालवे ठरला. त्याला रोख 1 हजार रुपये, मानाचा बेल्ट, आकर्षक ट्रॉफी व सर्टीफिकेट देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रीय पंच प्राचार्य जयंत गिते, राज्य पंच अशोक बेरड, रा
ज्य पंच दत्ता रणसिंग यांनी काम पाहिले. स्टेज मार्शल प्रशांत नेटके व राज्य पंच शब्बीर अन्सार सय्यद यांनी काम पाहिले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अ.नगर जिल्हा बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष महेश दादा सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम भोगाडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.अविनाश मोरे, मयुर गिते, अमोल गायकवाड, मनोज गायकवाड, आशिष बोर्डे, नावेद कुरेशी, नईम शेख, शेख आसिफ, लेडिज फिटनेसच्या संचालिका रंजनाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रपती पुरस्कार विजेते मधुकर गायकवाड यांनी हा ‘शिवशक्ती श्री’ सोहळा लागोपाठ तिसर्‍या वर्षी भरविण्यात आला असून, गरीब, उदयन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरतो व व्यायामाविषयी नव्या मुलांमध्ये जागरुगता निर्माण करतो, असे सांगितले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच प्राचार्य जयंत गिते यांनी केले. स्पर्धेचे इतर विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे - सौरभ वैरागर, सुनिल राठोड, राहुल वडागळे, गौरव मिसाळ, अमित राऊत, ईश्‍वर वंजारी, धनंजय सोनवणे यांना आकर्षक ट्रॉफी व सर्टीफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.