पिंपरी-चिंचवड येथील पाच भंगाराची दुकाने जळून खाक
पिंपरी, दि. 09 - चिंचवडमधील कुदळवाडीमध्ये भंगाराच्या पाच दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पाच भंगार दुकाने, 30 ते 35 लाखांचा कच्चा माल व एक ट्रक जळून खाक झाला.
तळवडे अग्निशमन दलाचे जवान संतोष सरोटे म्हणाले की, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दुकान मालक आनंद भुजबळ यांचा फोन आला. या आगीत त्यांची भाडयाने दिलेली दोन भंगाराची दुकाने जळून खाक झाली होती. यासाठी घटनास्थळी अग्निशमन दल व टेल्को बजाज यांच्या गाडया अशा 12 गाडयांनी मिळून सकाळपर्यंत ही आग आटोक्यात आणली.