स्वावलंबन श्रमसंस्कार व स्वविकासातून समाजाचा विकास होतो
। कल्पतरू शैक्षणिक संकुलाचे संजय उपाध्ये हस्ते उद्घाटन
अहमदनगर, दि. 29 - आजपर्यंत सावलीने निराधार वंचित मुलांसाठी त्यांच्या विकासासठी व स्वावलंबनासाठी गेली पंधरा वर्षांपासून एक कुटुंब उभं करतांना मुलांच्या हक्काविषयी भक्कम काम उभे केले आहे. आज पर्यंत शेकडो मुलांना सावलीचा आधार मिळाला आहे व मुलं चांगले आयुष्य जगत आहे. निराधार वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वविकास स्वावलंबन व श्रमसंस्कारातूनच समाज विकास होईल. समाजाला प्रेरणा देणारे कार्य सावली मध्ये होत आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.सावलीतील व निराधार अनाथ मुलांच्या कौशल्य वृद्धी व रोजगार निर्मितीच्या संकल्प प्रतिष्ठान संचलित कल्पतरू शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन संजय उपाध्ये यांनी केले. या प्रसंगी ते बोलत होते. डॉ.संजय उपाध्ये गेली दहा वर्षांपासून सावलीचे मुख्य पालक असून आतापर्यंत पंधरा लाखांपेक्षा जास्त मदत त्यांनी उभी करून दिली आहे. कल्पतरू शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन चरखा व तीस हजार रुपये देऊन डॉ.संजय उपाध्ये यांनी केले. या प्रकल्पात समाजातील निराधार, वंचित, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले, आई-वडील सोडून गेलेले मुलामुलींसाठी निवासी कल्पतरू शैक्षणिक संकुल उभे राहणार आहे. याची सुरुवातच चरखा देऊन करण्यात आली. या संकुलात सेंद्रिय शेती, चरखा प्रशिक्षण, सुतारकाम, वेल्डिंग, पेंटिंग, प्लंबिंग, फुड प्रोसेसिंग व विविध आद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.समाजातील निराधार मुलांना कुटुंब व मुलांचे अधिकार न मिळाल्याने ही मुले शोषणाला बळी पडतात अथवा गुन्हेगारी कडे वळतात. कल्पतरू शैक्षणिक संकुलामुळे ही मुले स्वतःच स्वावलंबी होऊन चांगले नागरिक बनतील असा विश्वास पुण्याचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.विजय मादगीकर यांनी केले.कल्पतरू शैक्षणिक संकुलाची जबाबदारी सावलीतील माजी विध्यार्थी तुषार देशमुख, विशाल चव्हाण, मोनिका पैठणपगारे, राहुल कांबळे, एकनाथ भुजबळ, प्रवीण चव्हाण हे पाहणार आहेत.कल्पतरू शैक्षणिक संकुलासाठी शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत तीन एकर जागेची आवश्यकता असून दानशूर व्यक्तींनी या कार्यात सहभागी होऊन जमिनीसाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ.संजय उपाध्ये यांनी केले. प्रास्ताविक नितेश बनसोडे यांनी केले. आभार राहुल कांबळे यांनी मानले.