Breaking News

नवीन वर्गखोलीसाठी साडेपाच लाखांचा निधी : काकडे

शेवगाव (प्रतिनिधी) । 30 -  तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा मुर्शतपूर या शाळेसाठी नवीन एक वर्गखोली बांधकामास सुमारे 5 लाख 55 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या वरूर गटाच्या सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांच्या विशेष प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला. या बाबत वर्ग खोली निधी मंजुरीचे आदेश शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी नुकतेच दिले. मुर्शतपूर येथील जि.प.प्रा.शाळेची इमारत जुनी झाल्याने पडझड झाली होती. गतवर्षापासून तसेच यंदा शाळा सुरू झाल्यानंतर शाळेतील मुलांना पहिल्या दिवसापासूनच उघड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली होती. जि.प.सदस्या सौ. काकडे यांनी याची दखल घेत जि.प. प्रशासनाकडे त्वरीत पाठपुरावा करून या शाळेसाठी नवीन एका वर्गखोली बांधकामास मंजुरी मिळाली. आणखी एका नवीन वर्गखोलीची या शाळेस गरज असून, त्याबाबतही पाठपुरावा सुरू असल्याचे सौ. काकडे म्हणाल्या. शाळेला नवीन वर्गखोली मंजूर केल्याबद्दल सौ. काकडे यांचे सरपंच सविता आप्पासाहेब जवरे, ग्रा.पं. सदस्य विमलताई ढाकणो, विठ्ठल खर्चन,रंगनाथ ढाकणो, किसन ढाकणो,नवनाथ धावणो,उत्तमराव धावणो, आप्पासाहेब जवरे, बाळासाहेब धावणो, शहादेव जवरे, डॉ. ढाकणो, आदिनाथ ढाकणो आदींसह ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले आहे.