‘हिंदूहृदसम्राट’ अॅकेडमीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा- बुधवत
बुलडाणा, दि. 30 - स्पधेंच्या युगात गोरगरीब विद्यार्थी क्षमता असतांनाही न्युनगंडामुळे मागे राहतात. त्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार कायम राहिला आहे. या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकेडमीच्या मोफत प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात नमूद आहे की, महाराष्ट्रातील 1 हजार विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षाकरिता हे प्रशिक्षण तज्ज्ञांकडून दिल्या जाईल. भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस, आयपीएस व आयएफएस परीक्षाकरीता मुंबई येथे मार्गदर्शन केंद्र चालवल्या जात आहे. शिवसेनेच्या सुर्वणमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी टक्का स्पर्धा परिक्षेतून वाढावा यासाठी विद्यार्थ्यांकडून 10 जुलै पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करता येतील. तसेच ऑफलाईन अर्ज हे बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्क कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या अर्जामधून 17 जूलै रोजी एन्ट्रंस परीक्षेचे सकाळी 11 ते 1 या वेळेत निर्धारित ठिकाणावरुन घेण्यात येईल. 27 जुलैला निकाल जाहीर होईल. या विनामुल्य प्रशिक्षणांचा लाभ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकाडमी कडून देण्यात येईल. तसेच 10 वी 12 वी नंतर पुढे काय? हा प्रश्न पडणा-यांसाठी 3 वर्षाचा फाऊंडेशन कोर्स देखील शिवसेनेकडून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात मोफत राबविल्या जात आहे. भूमीपुत्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी केले एका पत्रकाद्वारे केले आहे.