राज्यात अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार डच्चू
मुंबई, दि. 08 - राजकीय वर्तुळात सध्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या गच्छंतीनंतर संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालटाविषयी जोरदार चर्चा सुरू असून कोणाची महसूलमंत्रिपदी वर्णी लागणार यासह विस्तारात कोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता असतानाच मुख्यमंत्री कामगिरी आणि क्षमतेचा विचार करूनच राज्यमंत्र्यांना देण्याबाबत विचार करीत असल्याचे समजते. तसेच छाप न पाडलेल्या मंत्र्यांबाबत कोणतीही तडजोड न करता थेट डच्चू मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
इतक्या लवकर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती. मात्र एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्याकडील महत्त्वाच्या बारा खात्यांचा कारभार कोण पाहणार, हा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्तार करण्याशिवाय पर्यायच नव्हता. सध्या जे राज्यमंत्री विद्यमान मंत्रिमंडळात आहेत. त्यापैकी काही मंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती दिली जाणार आहे. यामध्ये फक्त भाजपच्याच मंत्र्यांचा विचार केला जाईल असे नसून, मित्रपक्ष शिवसेनेच्याही मंत्र्यांचा विचार केला जाणार असल्याचे समजते. भाजप- शिवसेना युती असली, तरी जनतेपुढे एकसंघ सरकारची प्रतिमा उंचावणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढील आव्हान आहे. त्यादृष्टीनेच मुख्यमंत्री भाजपबरोबर शिवसेनेच्याही राज्यमंत्र्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा तपासतील. त्यानंतर शिवसेनेच्या एखाद्या राज्यमंत्र्याला कॅबिनेटपदी बढती देणे गरजेचे वाटत असेल, तर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी निश्चितच चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. कॅबिनेटपदी बढती देताना कामगिरी आणि क्षमता हेच निकष मात्र पाहिले जाणार आहेत. त्यांची कामगिरी समाधानकारक नाही असे वाटल्यास प्रसंगी मंत्रिमंडळातून डच्चूही देण्याचा विचार मुख्यमंत्री करीत असल्याचे समजते.