दाभोलकर हत्या प्रकरणी तीन पोलिसांची चौकशी
मुंबई, दि. 18 - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट पोलीस अधिकार्यांचाच सहभाग असल्याचा संशय सीबीआयला आहे. याप्रकरणी सबीआय दोन निवृत्त पोलीस अधिकारी आणि सेवेत असलेल्या एका पोलिस अधिकार्यांची चौकशी करत आहे.
यामध्ये निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांचाही समावेश आहे. रमाबाई आंबेडकर नगरमधील दंगलीत कदम यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर कोर्टानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण हायकोर्टानं त्यांना जामीन दिला. त्यानंतर त्यांनी सनातनच्या साधकांना प्रशिक्षण दिल्याचा संशय आहे.
यात फरार आरोपी सारंग अकोलकर, रुद्र पाटील, विनय पवार आणि प्रवीण निमकर यांना प्रशिक्षण मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर दाभलोकरांच्या हत्येसाठी वापरलेली रिव्हॉल्वर बनविण्यात पोलिस अधिकार्यांनी मदत केल्याचा संशय आहे.
विशेष म्हणजे सध्या सेवेत असलेल्या एका पोलीस अधिकार्याने सनातनवर काय कारवाई सुरु आहे, याची माहिती सनातनला दिल्याचा आरोपही सीबीआयनं केला आहे.