सेरेनाने शारापोवाला मागे टाकले
लॉस एंजेलिस, दि. 08 - यंदाच्या मोसमात अनपेक्षितपणे सलग दोन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने कमाईच्या बाबतीत मात्र जबरदस्त आघाडी मिळवली आहे. या वेळी तिने तब्बल 11 वर्षे कमाईच्या बाबतीत अग्रस्थान राखलेल्या रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोवाला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली.
एका नामांकित मॅगझीनने दिलेल्या माहितीनुसार सेरेनाने सर्वाधिक
कमाई करणार्या महिला खेळाडूंमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. या वेळी तिने एकेकाळी याबाबतीत अग्रस्थान राखलेल्या आणि सध्या डोपिंगमुळे अनिश्चित काळासाठी बंदीला सामोरी गेलेल्या मारिया शारापोवाला पिछाडीवर टाकले.
अमेरिकेची मिक्स मार्शल आर्ट खेळाडू रोंडा रोसी हिने जबरदसत मुसंडी मारताना 1.4 कोटी डॉलरच्या कमाईसह आठव्या स्थानावरून थेट तिसर्या स्थानी कब्जा केला. तर तिच्यानंतर नास्कार ड्रायव्हर डॅनिका पैट्रीक (1.30 कोटी डॉलर) चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे अव्वल 10 खेळाडूंमध्ये टेनिसपटूंचा अधिक समावेश आहे.