हरियाणात एका महिन्यात तिसरा स्फोट
फतेहाबाद, दि. 08 - एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये तीन स्फोट हरियाणामध्ये झाले असून यावेळी फतेहाबाद जिल्ह्यातील भूना येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता एका खासगी बसमध्ये स्फोट झाला. त्यानंतर बसमध्ये आग लागली. या स्फोटात 15 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जा
त आहे. भूना येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींना दाखल करण्यात आले आहे. पोलिसांसह फॉरेंसिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट जाखल ते फतेहाबाद मार्गावर धावणार्या खासगी बसमध्ये झाला. सकाळी 11 वाजता भूना येथून बस निघाली तेव्हा चालत्या बसमध्ये एक युवक चढला होता. बस फक्त अर्धा किलोमीटर चालली असेल तेव्हा त्यात स्फोट झाला. स्फोटामुळे आग लागली. तेव्हा बसमध्ये एकच गदारोळ झाला. काही प्रवाशांचे हात-पाय भाजले, जवळपास 15 लोक या स्फोटात जखमी झाले. जखमींपैकी एक दाम्पत्य गंभीर आहे. त्यांचे नाव बालादेवी आणि भूपसिंह असल्याचे समजते. स्फोटानंतर चालत्या बसमध्ये चढलेला युवक फरार झाला. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. घटनास्थळी फतेहाबादचे पोलिस अधीक्षक ओ.पी.नरवाल आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट टीम पोहोचली आहे.