Breaking News

विहिपच्या फायर ब्राँडचे वादग्रस्त वक्तव्य

देहरादून, दि. 08 -  पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव करून एका नव्या वादाला बेताल वक्तव्य करून नेहमी चर्चेत असणारी विश्‍व हिंदू परिषदेची फायर ब्राँड साध्वी  प्राची यांनी तोंड फोडले आहे. देश काँग्रेस मुक्त भारत बनला असून आता मुस्लीम मुक्त भारत बनला पाहीजे असे वक्तव्य प्राची यांनी केले आहे. रुडकीमधील लंढोरा  येथील कुंवर प्रणव सिंह चैम्पियनच्या महलावरील झालेल्या हल्ल्यावर साध्वी प्रतिक्रिया देत होत्या. जो हल्ला रंगमहलवर करण्यात आला आहे, तो पूर्वनियोजित  होता, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी काँग्रेसप्रमाणे मुस्लीम मुक्त भारत करण्याचे वादग्रस्त विधान केले. साध्वींनी मथुराकांडाची तीव्र शब्दांत निषेध नोंदवत  प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्याची मागणी केली.