Breaking News

चारठाणा येथे सिमेंट बंधा-यात साठले पाणी

परभणी, दि. 30 - जल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाले असून  नुकत्याच झालेल्या पावसाने जिंतुर तालुक्यातील चारठाणा परिसरातील ओढे-नाल्यांत पाणी साठले. जलयुक्त शिवार अभियानात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग अंतर्गतही जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे झाली आहेत. या कामांची परिणामकारता आता दिसून येऊ लागली आहे. सिमेंट बंधा-याच्या खोलीकरणाची कामे प्रभावीपणे झाल्यामुळे बंधा-यात पाणी साठले आहे.   जिल्हयात विविध विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे झाली आहेत. काही प्रगतीपथावर आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जिंतुर तालुक्यातील चारठाणा येथे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग अंतर्गत सिंमेट बंधारे उभारले आहेत, नाला खोलीकरणाची कामेही झाली आहेत. चारठाणा येथील बंधा-यात नुकत्याच झालेल्या पावसानंतर पाणी साठले. साठलेल्या पाण्यामुळे शिवारातील विहिरींच्या, पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या तसेच बोअरच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे कार्यकारी अभियंता डी एस वाघ यांनी सांगितले. खोलीकरण केलेले ओढे भरुन वाहु लागल्याने तसेच साचलेले आणि वाहणारे पाणी पाहुन परिसरातील  शेतकरी आनंदित झाले आहेत.