Breaking News

डॉ.अंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ भारीपचा भव्य मोर्चा

बुलडाणा, दि. 30 - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दादर, मुंबई येथील आंबेडकर भवन, भाडोत्री गुंडाकडून तोडण्यात आले. त्या गुंडाना व त्यास जबाबदार असणा-या लोकांना त्वरीत अटक करण्यात यावी व त्यांचेवर कार्यवाही व्हावी यासाठी भारीप बहुजन महासंघ, भारतीय बौध्द महासभा, इतर आंबेडकरी संघटना संस्था तसेच आंबेडकरी समुह शाखा बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने आज 29 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
24 जून ला रात्री 3 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची दादर येथील आंबेडकर भवन भाडोत्री गुंडाकडून पिपल्स इंम्प्रुमेंट ट्रस्टचे मुख्य सल्लागार व त्यांचे ट्रस्टी यांचे आदेशान्वये भाडोत्री गुंडाकडून तोडण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या जागेवर बुध्दभुषण प्रिटींग प्रेस काढून मुक नायक, बहिष्कृत भारत, जनता व प्रबुध्द भारत यापैकी तीन वर्तमानपत्रे सदर प्रिंटीग प्रेस मार्फत चालविली व समाज जागृती केली तसेच चळवळ उभारली त्या प्रेसला उध्वस्त करण्यात आले. ही जागा पिपल्स इंम्प्रुमेंट ट्रस्टकडे असतांना त्या ट्रस्टवर रत्नाकर गायकवाड हे अवैधरित्या आधी ट्रस्टी व नंतर मुख्य सल्लागार बनुन कुठल्याही आदेशाविना आंबेडकर भवन बुध्दभुषण प्रिटींग प्रेस 500 ते 700 भाडोत्री गुंडाकडून तोडण्यात आली. आंबेडकरी भवनाची ही जागा खाजगी बिल्डरच्या घशात घालून त्या जागेवर प्रस्तावित 17 मजली व्यावसायिक संकुल बांधण्याचा प्रयत्न रत्नाकर गायकवाड यांच्या माध्यमातून चालला आहे.  याला वेळीच आळा घालावा व कायदेशीर गुन्हे  दाखल करावेत या मागणीसाठी दिलीपभाई खरात, भिमराव तायडे, समाधान जाधव, एस.बी.दाभाडे, के.एम.हेलोडे, जी.वाय.बाभुळकर, पी.पी.वाकोडे, डी.एन.सरकाटे, सुरेश पवार, विक्रम नितनवरे, दगडु सरदार, भीमराव सिरसाट, वा.का.दाभाडे, डी.आर.इंगळे, भिमराव नितोने, एस.सी.मोरे यांच्यासह शेकडोंची उपस्थिती होती.