ट्रान्स हार्बरसाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या इच्छुक
मुंबई, दि. 30 - ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’च्या (एमटीएचएल) बांधणीचे कत्रांट मिळवण्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे. एमटीएचएलसाठी 7 जुलै रोजी निविदा उघडल्या जाणार असल्याचे एमएमआरडीएद्वारे सांगण्यात आले. जवळपास 18 हजार कोटींचे काम मिळवण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा 22 कि. मी. लांबीच्या या प्रकल्पाचे तीन टप्प्यात बांधकाम केले जाणार आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा एमटीएचएल हा प्रकल्प एमएमआरडीएसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणा-या पर्यावरण खात्याच्या तसेच सीआरझेड संबंधीच्या सर्व अटी, नियमांची पूर्तता एमएमआरडीएने केली आहे. प्रकल्पाच्या बांधकामासाठी आवश्यक सर्व परवानगी मिळाल्याने प्रकल्पाच्या मार्गातील मोठी अडचण दूर झाली आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने मे महिन्यात पूर्व अर्हता निविदा काढल्या होत्या. या प्रकल्पासाठी कंपन्यांची पूर्व अर्हता चाचणीही महत्त्वपूर्ण आहे. कंपनीच्या निवडीसाठी पूर्व अर्हता हा प्राथमिक टप्पा असून त्यातून निवडलेल्या कंपन्यांच्या नावांवर जपानच्या बँकेच्या पसंतीची मोहर घ्यावी लागणार आहे.
पूर्व अर्हता निविदा प्रक्रियेत 15 ते 20 इच्छुक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावल्याचे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या एकत्रितपणे प्रस्ताव सादर करण्याची शक्यता असल्याने त्यांनी निविदा दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागून घेतली आहे. 7 जुलै रोजी निविदा उघडल्या जाणार असून तेव्हा प्राथमिक चित्र स्पष्ट होईल.
त्यातून इच्छुक कंपन्या प्रकल्पाच्या अर्हता यादीत निवडल्या जातील. पुढे प्रकल्पाच्या बांधणीसाठी मुख्य निविदा निघतील. या सर्व प्रक्रियेत एक ते दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. साडेचार वर्षात प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असून एमएमआरडीएच्या नियोजनाप्रमाणे निविदेद्वारे निवडल्या जाणा-या कंपन्यांना ऑक्टोबपर्यंत कामाचे आदेश दिले जाणार आहेत.