Breaking News

दिन दुबळ्यांच्या सेवेमध्येच परमेश्‍वर ःवेताळ

अहमदनगर (प्रतिनिधी) । 29 - पार्वतीबाई वेताळ प्रतिष्ठान आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनने सतत दीन दुबळ्या गरिबांमध्येच परमेश्‍वर पाहुन त्यांची सेवा करण्याचा वसा हाती घेतला आहे. असे प्रतिपादन काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सौ. अनिता वेताळ यांनी केले आहे. 
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे डॉ. विखे पाटील फोंडेशनच्यावतीने विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबीर घेतले. त्यावेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू होता त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले. तसेच ज्यांना ऐकू येत नाही अशा रुग्णांना कानाचे मशिन देण्यात आले. सर्वरोग निदान शिबिरातील सर्व रुग्णांना औषधे देवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. वर्षेभर ना. विखे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून जिल्ह्यातील प्रत्येक गावात डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शिबिर घेतली जाणार आहेत.