Breaking News

समाजाच्या प्रगतीवर भर देणार : चोपडा

।  येत्या 30 तारखेस राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार । 3 जुलै रोजी नाशिक येथे शपथविधी  

जामखेड   (प्रतिनिधी) । 29 - जैन समाजाची मातृ संस्था जैन कॉन्फरन्स दिल्लीचे नव निर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा जामखेड दौरा नुकताच पार पडला . जामखेड येथे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांच्या निवास स्थानी चोपडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोठारी यांच्या स्नुषा सौ श्‍वेता कोठारी आणि पत्नी सौ. सारला कोठारी यांनी औक्षण केले . 
या वेळी जेष्ठ नेते पारस मोदी म्हणाले की, समाज बांधवांनी चोपडा यांच्यावर विश्‍वास दाखवत 12 राज्यात झालेल्या निवडणुकीत सुमारे 2300 मतांचे मताधिक्य दिले. तामिळनाडू राज्याची निवडणूक लांबली होती ती काल (दि 26) रोजी पार पडली त्या ठिकाणी 490 पैकी 430 मते चोपडा यांना मिळाली . या धर्तीवर दिल्ली येथील कार्यालयीन निवडणूक अधिकार्यांनी मोहनलाल चोपडा यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असून येत्या 30 तारखेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार असून 3 जुलै रोजी नाशिक येथे शपथविधीचे आयोजन केल्याची माहिती दिल.ी.
यावेळी सत्कारास उत्तर देताना चोपडा म्हणाले की , जैन समाज अल्पसंख्यांक समाज म्हणून जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल यासाठी प्रयत्नशील राहत समाजाच्या प्रगतीवर जास्त भर देणार आहे. जामखेड मधील संजय कोठारी हे राज्यातून राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य पदासाठी निवडून आले आहेत . अत्यंत चांगली मते त्यांना मिळाली असून त्यांच्या मार्फत जामखेड भागात आणखीन काम वाढणार आहे. या वेळी जामखेड जैन समाजाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, अभय चोपडा, मिठूलाल नवलाखा, माजी सरपंच सुनील कोठारी, प्रवीण छाजेड, प्रशांत बोरा, विजय कोठारी, प्रवीण चोरडिया , मनसुखलाल कोठारी, सुनील चोरडिया, गणोश भळगट, अमोल ताथेड , विनोद बोरा, संदीप भंडारी, मनोज भंडारी, अमृत कोठारी, हर्षल कोठारी, संपत बोरा, सुनील पितळे, नेमीचंद चनोडिया, अनिल मेहेर , धरम ललवाणी , पिंटू बोरा , आदीं सह संस्थेचे मतदार आणि व्यापारी उपस्थित होते. या वेळी तेजस कोठारी यांनी सूत्रसंचालन केले, तर रोहन कोठारी यांनी आभार मानले .