रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी विश्वनाथन
दिल्ली, दि. 29 - रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून एन. एस. विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंगळवारी ही घोषणा केली. येत्या 3 जुलैपासून विश्वनाथन हे एच. आर. खान यांची जागा घेतील.
रिझव्र्ह बँकेकडे चार डेप्युटी गव्हर्नर नेमण्याची तरतूद आहे. त्यातील दोन बाहेरील असतात तर दोघे रिझव्र्ह बँकेतीलच असतात. मध्यवर्ती बँकेच्या गैरबँकिंग देखरे
ख विभागात विश्वनाथन यांनी मुख्य महाव्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे.
एप्रिल 2014पासून ते बँकेचे कार्यकारी संचालक आहेत. अर्थशास्त्रातील एम. ए. पदवी मिळवलेले विश्वनाथन यांनी पंजाब नॅशनल बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.
कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वाखालील शोध समितीने विश्वनाथन यांची निवड केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नियुक्ती समितीने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. विश्वनाथन यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत अधिसूचना लवकरच काढण्यात येईल.
विश्वनाथन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याकडे कोणतेही नियुक्तीपत्र आलेले नाही. माध्यमांतूनच मला ही बातमी समजली, असे सांगितले. यापूर्वी सर्व डेप्युटी गव्हर्नरची निवड रिझव्र्ह बँक गव्हर्नरच्या नेतृत्वाखालील पॅनलने केली आहे.
यंदा मात्र कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील शोध समितीने निवड केली. गव्हर्नर रघुराम राजन यांचाही त्यात समावेश होता.