Breaking News

नुआन कुलसेखराची कसोटीतून निवृत्ती

कोलंबो , दि. 01 - कसोटी क्रिकेटमधून श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज नुआन कुलसेखरा याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुलसेखराने आपला हा निर्णय श्रीलंका क्रिकेट मंडळाला पत्र लिहून कळविला आहे. मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने या पत्रात म्हटले आहे. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटची तयारी योग्यरित्या करून श्रीलंका संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा मी ठरविले आहे. मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे.
2014मध्ये लॉर्ड्स मैदानावर कुलसेखराने श्रीलंकेकडून शेवटची कसोटी खेळली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 21 सामन्यांत 48 बळी घेतले आहेत. त्याने एप्रिल 2005मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये खेळणार आहे.