विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत
बुलडाणा (प्रतिनिधी) दि. 29 - उन्हाळयाच्या सुट्टीनंतर आज सोमवार 27 जून रोजी शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांची किलबिलाट पहायला मिळाली. या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी पुष्पगुच्छ व पुस्तकांचे वाटप करुन स्वागत केले. स्थानिक जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जांभरुण येथे आ.हर्षवर्धन सपकाळ, जि.प. शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठग, पं.स गटशिक्षणाधिकारी आंधळे, विस्तार अधिकारी श्रीमती जयश्री बोडें यांनी शाळेला भेट दिली. आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प देवून स्वागत केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना गणवेश,पाठ्यपुस्तक व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सोनुने, ग्रामविकास अधिकारी टेकाडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सोनुने, शिक्षिका कु.कोल्हे उपस्थित होते.