Breaking News

दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात यश

श्रीनगर, दि. 30 -  जम्मु काश्मीर राज्यामधील पुलवामा जिल्हयामध्ये गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाच्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले.
पुलवामामधील एका गावामध्ये आज पहाटेपासून सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये धुमश्‍चक्री सुरु होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोन पोलिस जवानही जखमी झाले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, या कारवाईदरम्यान येथील स्थानिक आंदोलक व सुरक्षा दलामध्येही संघर्ष झाला.या कारवाईबरोबरच आता काश्मीर खोर्‍यामध्ये गेल्या अवघ्या दहा दिवसांत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या 12 झाली आहे.