Breaking News

पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांच्या कामाचा आढावा

6 जुलैपुर्वी मंत्रीमंडळाच्या फेरबदलाची शक्यता

नवी दिल्ली, दि. 30 -   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांचा कामाचा आढावा घेणार असून, सर्वच मंत्र्यांना ‘सेल्फ अप्रायझल’ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व मंत्र्यांचा कामाचा आढावा घेतल्यानंतर मोदी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याबद्दलचा निर्णय अंतिम करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. येत्या 6 जुलैला मोदी आफ्रिकेच्या दौर्‍यावर रवाना होत आहेत. त्यामुळे त्यापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होणार हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर तेथील काही महत्त्वाच्या नेत्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाऊ शकते आणि सध्या परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना नारळही दिला जाऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येते आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.मोदी सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत मोदी यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांच्या कामकाजाचा स्वतंत्रपणे आढावा घेतलेला आहेच. पण विकासकामांना अधिक गती देण्यासाठी मोदी जास्त प्रयत्नशील असून, त्यामध्ये कोणत्याही मंत्र्यांचा परफॉर्मन्स कमी राहू नये, म्हणून यावेळी एकत्रितपणे सर्वच मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. निवडणुका होणार्‍या राज्यांमध्ये जी कामे प्रलंबित आहेत. ती तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असेही निर्देश मोदी यांनी दिले आहेत.येणार्‍या उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर तेथील काही महत्त्वाच्या नेत्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाऊ शकते आणि सध्या परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना नारळही दिला जाऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येते आहे.
पुढील महिन्यातील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आणि केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चिन्हे असताना