सोनवलकरांचा अखेर राजीनामा; सुभाष नरळे नूतन अध्यक्ष
सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी आपला राजीनामा पुणे विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम् यांच्याकडे सादर केला. चोकलिंगम यांनी सोनवलकर यांचा राजीनामा मंजुर केला असून नवीन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या सुचना जिल्हाधिकार्यांना दिल्या. अध्यक्ष पदी मार्डी जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुभाष नरळे यांची निवड निश्चित झाली आहे. दरम्यान, विषय समिती सभापती राजीनाम्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे आता पक्षाकडून उपाध्यक्ष रवि साळुंखे यांचा राजीनामा घेण्याकडे जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे माजी उपुमुख्यमंत्री अजित पवार यांनी 6-7 महिन्यांपासून पदाधिकार्यांचे राजीनामे घेवून नूतन सदस्यांना संधी देण्याच्या सुचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या होत्या. पवार यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पक्षातील इच्छुकांनी बंडाचा झेंडा फडकावला. पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी आयुक्तांऐवजी पक्षाकडे राजीनामा दिला. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींचे राजीनामे घेण्यात आले. मात्र, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांनी न्यायलयिन लढाई लढून आपले पद कायम ठेवले. तर उर्वरित अमित कदम, मानसिंग माळवे, कल्पना मोरे यांचे राजीनामे मंजूर करून नूतन सभापतींची निवड केली.
तब्बल दोन महिन्यांनतर माणिकराव सोनवलकर यांनी विभागीय महसूल आयुक्त एस. चोकलिंगम यांच्याकडे राजीनामा सादर केला. सोनवलकर यांचा राजीनामा आयुक्तांनी मंजूर करत नूतन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूुचना जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी नूतन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम दोन दिवसात जाहीर करण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या उपस्थितीत विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करून नूतन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. नूतन अध्यक्षपदी माण तालुक्यातील मार्डी गटाचे सदस्य सुभाष नरळे यांचे नाव पक्षश्रेष्ठींनी निश्चित केले आहे.
नरळे हे स्व. माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचे कट्टर सर्मथक आहेत. दरम्यान, खा. उदयनराजे सर्मथक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवि साळुंखे यांचा राजीनामा पक्ष घेणार का याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.