Breaking News

छत्रपती शाहू महाराजांचे विचार आजही प्रेरणादायी

 । तहसिलदार गणेश मरकड यांचे प्रतिपादन 


अहमदनगर, दि. 30 - छत्रपती शाहूमहाराजांचे कार्य व विचार आजही मार्गदर्शक असून, समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यातून मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेचे तहसीलदार गणेश मरकड यांनी केले.
छत्रपती शाहूमहाराज जयंती, तसेच सामाजिक न्याय दिनानिमित्त येथील स्व. रामलालजी ललवाणी मेमोरियल फौंडेशनच्या वतीने गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप श्री. गणेश मरकड यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य प्रत्येकाने यथाशक्ती केले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी स्व.रामलालजी ललवाणी मेमोरियलफौंडेशनचे अध्यक्ष अभय ललवाणी, कॉमसुर्या टेक्नॉलॉजीज्चे योगेश पवार, उल्हास नांगरे, गणेश भंडारी, ऋषभ लोढा आदी यावेळी उपस्थित होते.