आंबेडकर भवन पाडणार्यांवर गुन्हे दाखल करा; आंदोलनकर्त्यांची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)। 30 - दादर या ठिकाणी असलेले आंबेडकर भवन पाडणार्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या (भारतीय बौध्द महासभा) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी कोणतीही पुर्वसूचना न देता पहाटे अचानकपणो मोठ्या जमावाने आंबेडकर भवनाचे बांधकाम पाडल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, आण्णासाहेब गायकवाड, उज्वला गायकवाड, भगवंत गायकवाड, माधवराव चाबुकस्वार, विष्णू गायकवाड, रमेश गायकवाड, शिवाजी भोसले, मनोज पंचमुख, अविनाश भोसले, किशोर कांबळे, राजेश कांबळे आदि उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दादर येथे बांधलेल्या भवनात बुध्दभुषण पिंट्रींग प्रेस, भारतीय बौध्द महासभा, भारीप बहुजन महासंघाचे व रिपब्लिकन सेना यांची कार्यालये होती. शनिवार दि.25 जून रोजी पहाटे अचानकपणे जेसीबीच्या सहाय्याने सदर भवन पाडण्यात आले. या भवनात असलेल्या बौध्दभुषण प्रिंटींग प्रेसच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची माहिती समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य चालू होते. सदर आंबेडकर भवन पाडल्याने आंबेडकरवादी जनतेच्या अस्मितेला धक्का लागून, भावना दुखावल्याचे निवेदनात म्हटले आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधीतावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले. या मागणीची दखल न घेतल्यास आंबेडकरी जनतेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.