सुशील कुमारसाठी रिओची कवाडं बंद
नवी दिल्ली, दि. 06 - आज रिओ ऑलिंपिकसाठी पात्र जागेवर नरसिंह यादव जाणार की सुशीलकुमार, याचा निर्णय अखेर स्पष्ट झाला असून, सुशीलकुमारने दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. नरसिंह यादवचा रिओ ऑलिंपिकमधील मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.
भारतीय कुस्ती आणि पर्यायाने सुशीलकुमारसाठी आजचा दिवस संघ निवडीचा प्रश्न न्यायालयात गेल्यामुळे निर्णायक होता. दिल्ली उच्च न्यायालयाने अखेर सुशीलकुमारची याचिका रद्द करत नरसिंह यादवचा ऑलिंपिक प्रवेश निश्चित केला. या निर्णयावर ऑलिंपिकचा मल्ल निश्चित होणार होता. भारतीय कुस्तीला वेगळे वळण मिळणार असल्याने सर्वांच्याच नजरा न्यायालयाच्या निर्णयाकडे लागून होत्या.