सातारा-गाळदेव बससेवा सुरु
सातारा दि. 01 (प्रतिनिधी) : जावली तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्या डांबरी रस्त्याने जोडण्यात आल्याने ही गावे विकासाच्या प्रवाहात आली आहेत. पक्क्या रस्त्यांमुळे दळणवळणाची सोय झाली असून दुर्गम, डोंगराळ भागातील जनता विकासाच्या प्रवाहात आली आहे. एकीव ते गाळदेव या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने आता या रस्त्याने एसटी बस धावणार आहे. यामुळे बामणोली, एकीव ते गाळदेव या भागात येणार्या सर्वच गावातील लोकांना याचा फायदा होणार असून एसटी प्रशासनाने प्रवाशांना आपुलकीची सेवा देवून एसटी महामंडळाचे ब्रीद साध्य करावे, असे आवाहन आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात सातारा-यवतेश्वर-एकीव-गाळदेव या मुक्कामी बससेवेचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जावली पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी, सातारा विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक अधिकारी विनोद भालेराव, सहायक वाहतूक अधिक्षक वैभव कांबळे, नौशाद तांबोळी, विजय देशमुख आदी मान्यवरांसह गाळदेव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकीव-सह्याद्रीनगर-गाळदेव या रस्त्याचे कामही नुकतेच मार्गी लावल्याने बामणोली भाग आणि गाळदेव भाग एकमेकांना जोडला गेला आहे. आज सातारा-यवतेश्वर, एकीव ते गाळदेव अशी बससेवा सुरु झाली असून या बसमुळे बामणोली भागातील पारंबे फाटा, एकीव, एकीव मुरा, आखाडे वस्ती, कुसूंबी मुरा, सांगवी मुरा, सह्याद्रीनगर, निपाणी मुरा, गाळदेव या परिसरातील अनेक गावे, वाड्या-वस्त्यांना या बससेवेचा लाभ होणार आहे. लवकरच कुसुंबी, कोळघर घाट रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. ज्या गावात मोठ्या बसेस जाणार नाहीत त्या, गावांसाठी मिनी बसेस उपलब्ध कराव्यात. विभाग नियंत्रकांनी तातडीने प्रस्ताव तयार करावा. यासंदर्भात आपण पाठपुरावा करणार असून बोर्णे घाट, पांगारे अशा गावात मिनी बससेवा सुरु झाल्यास त्याही ग्रामस्थांची चांगली सोय होईल. एसटी महामंडळाने प्रवाशांना चांगली सेवा द्यावी.