दारुबंदीसाठी स्व.राम मगर यांच्या आईचे आमरण उपोषण
बुलडाणा, दि. 01 - ब्रेन डेड झालेल्या स्व.राम मगरचे अवयव दान करुन राज्यात आदर्श उभ्या करणा-या सौ.मंदाबाई मगर आणि देऊळगाव माळी ता.मेहकर येथील शेतक-यांनी 30 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरु केले असून गावात संपूर्ण दारुबंद व्हावी, तसेच शेतक-यांना भुसंपादनाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दे.माळी येथे दारुमुळे अनेक कुटूंबावर दुष्परिणाम होत असून गावच्या सर्वागीन उन्नतीसाठी येथील दारुबंदी करण्यात यावी, तसेच देऊळगाव मही ते शेवगा या रस्त्याचे भूसंपादन 24 वर्षापूर्वी झाले आहे. जमीनीचे संपादन होवून 24 वषें पुर्ण झालेले असून. अद्याप पर्यंत जमिनीचा मोबदला मिळाला नाही.
सततची नापिकी व दुष्काळाला कंटाळून यावर्षी शेतजमीनसुध्दा पिकली नसल्याने, जी जमीन संपादन झाली तिचे पैसे मिळावे. यापूर्वी भूसंपादन अधिकारी यांना वेळोवेळी सूचीत करुन सुध्दा त्यांनी दखल घेतली नाही. म्हणून सर्व शेतक-यांनी 30 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणा सुरु केले आहे. यामध्ये ब्रेनडेड राम मगर ची आई श्रीमती मंदाबाई सु.मगर, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मगर, उपसरपंच विनोद फलके, दत्तु सोनुने, विठ्ठल काकडे, पुंडलीक काकडे, आनंदा फलके, सौ.पुष्पाबाई फलके, मदनलाल जैन, जनार्धन गवई, मारोजी गवई, रामभाऊ गाडेकर यांचा समावेश आहे.