Breaking News

एलआयसीचे अध्यक्ष एस. के. रॉय यांचा मुदतीआधीच राजीनामा

नवी दिल्ली, दि. 24 -  आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष एस. के. रॉय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुदतीआधीच दोन वर्षे त्यांनी पद सोडण्याचा  निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समिती त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेईल.
येत्या 29 जूनपासून आपल्याला पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, असे त्यानी राजीनामापत्रात लिहिले आहे. देशातील सर्वात मोठया विमा कंपनीच्या  अध्यक्षपदाची सूत्रे रॉय यांनी 29 जून 2013 रोजी स्वीकारली होती. त्यांच्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
पाच वर्षासाठी त्यांची नियुक्ती होती. परंतु मुदतीआधी दोन वर्षे त्यांनी पद सोडायचे ठरवले आहे. आयुर्विमा महामंडळाच्या इतिहासात अध्यक्षाने कार्यकाल  संपण्यापूर्वी पद सोडल्याची घटना घडलेली नाही. फक्त 1985 च्या अगोदर एका अध्यक्षाने स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
एलआयसीतील निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले की, रॉय यांची विनंती आम्ही सरकारकडे पाठवली असून सरकार त्यावर निर्णय घेईल.