राजकारणातून गुरूदास कामत यांचा संन्यास
मुंबई, दि. 07 - राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी जाहीर केला असून त्यांनी हा निर्णय मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्याशी असणारे मतभेद व पक्षात निष्ठावंतांना मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे घेतला असल्याचे समजते. अनपेक्षितपणे राजकारणातून कामत यांनी निवृत्ती घेतल्याने तोंडावर आलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
युवक काँग्रेस अध्यक्ष, मुंबई काँग्रेस अध्यक्ष, केंद्रीय मंत्री अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या गुरूदास कामत यांनी पार पाडल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून सध्या ते काम पाहत होते. गांधी घराण्याचे निष्ठावान म्हणूनही त्यांना ओळखले जाते; परंतु शिवसे
नेतून आलेल्या संजय निरूपम यांना दिले जाणारे महत्त्व, पक्षाच्या कार्यक्रमापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जाणे यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. पक्ष नेतृत्वाकडे तकारी करूनही त्याची साधी पोहोचही न आल्याने कामत यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
गेली 44 वर्षे आपण काँग्रेसची सेवा केली मात्र गेल्या काही महिन्यांपासून इतरांना संधी देण्यासाठी आपण मागे यायचे ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आपण 10 दिवसांपूर्वी भेट घेतली व राजीनाम्याबाबत त्यांना सांगितले होते. सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांना पत्राद्वारेदेखील ही भावना कळविली होती. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे आता त्यांना आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे औपचारिकरित्या कळविले असल्याचे गुरूदास कामत यांनी स्पष्ट केले आहे. गुरूदास कामत यांच्या अशा अनपेक्षित राजकीय संन्यासामुळे काँग्रेसला फटका बसू शकतो. आधीच पक्ष कमकुवत बनलेला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. कामत हे आक्रमक आणि कुशल संघटक असे नेते मानले जातात. निष्ठावंतांना काँग्रेसमध्ये किंमत मिळत नसल्याचे कारणदेखील कामत यांच्या राजकारण संन्यासामागे असल्याचे मानण्यात येत आहे.