भारतातून नेहमी उर्जा आणि उत्साह मिळतो : नडेला
नवी दिल्ली, दि. 01 - जन्माने आणि कर्माने भारतीय असणारे आपण भारतातून जाताना नेहमीच प्रचंड ऊर्जा आणि उत्साह घेऊन जातो. कारण मला मिर्झा गालिबच्या कवितेतून कॉम्प्युटर सायन्सइतकीच ऊर्जा मिळते, अशी रंजक माहिती सत्या नडेला यांनी दिली आहे.
भारतीय दौ-यावर आलेले सत्या नडेला यांनी आपल्या या भारतभेटीत नुकतेच राजधानीत युवा तंत्रज्ञांशी खुला संवाद साधला. त्यांनी या दरम्यान आपल्या वाटचालीचा पट उलगडून दाखविताना मिर्झा गालिब यांच्या कविता हीच आपल्या यशामागील प्रेरणा असल्याचे स्पष्ट केले. तंत्रज्ञान आणि काव्य या विरोधाभासी तत्त्वांच्या मिलाफाचा हा रंजक आविष्कार भारतीय तंत्रज्ञांना ऐकायला आश्चर्यजनक असला तरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कमालीची उंची गाठलेल्या नडेला यांची ती कहाणी होती. त्यामुळे तिच्याबाबत शंकेला जागाही नव्हती.
आपली प्रेरणा मिर्झा गालिब यांची कविता हा आपला विक पॉईंट असून काव्य आणि तंत्रज्ञान या दोनच विषयांत आपल्याला गती असल्याची जाणीव युवावस्थेत होती. या भूमीत प्रचंड सृजनशीलता आहे, प्रचंड ऊर्जाशक्ती आहे, मेहनत करण्याची टोकाची तयारी असणारे लोक या मातीत आहेत. कारण या मातीत मिर्झा गालिब यांची ‘एक दिल्ली के शायरने एक जमानेमे कहा था हजारो ख्वाईशे ऐसी हो के हर ख्वाईश पे दम निकले बहोत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले, या गालिब यांच्या काव्याची ताकद आहे. भारतात आलो की, मी भाबड्यासारखा ही ऊर्जा, सामथ्र्य काव्याची प्रेरणा घेऊन जातो आणि कार्यरत राहतो, असे सांगत नडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या आगामी प्रकल्पांची माहिती उपस्थितांना करून दिली.