Breaking News

4 भारतीय महिला शक्तीशाली महिलांच्या यादीत

न्यूयॉर्क, दि. 07 - जगभरातील 100 सर्वात शक्तीशाली महिलांची यादी नुकतीच फोर्ब्सने जाहीर केली असून भारताच्या चार महिलांचा या जगभरातील शक्तीशाली महिल्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत भारताच्या अरुंधति भट्टाचार्य, चंदा कोचर, किरण मजूमदार शॉ, शोभना भरतीया यांची नावे आहेत. या यादीत जर्मनच्या चान्सलर एंगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर तर यंदा चीनमधून पहिल्यांदाच 9 महिलांची नावे या यादीत आली आहेत.
जगभरातील शक्तीशाली महिलांची यादी फोर्ब्स 2004 सालापासून जाहीर करीत आहेत. तेव्हापासून जर्मनच्या चान्सलर एंगेला मर्केल ह्या 12 वर्षात तब्बल 11 वेळा सर्वात शक्ती
शाली महिला म्हणून पुढे आल्या आहेत. तर त्या या यादीत तब्बल सहा वेळा पहिल्या क्रमांकावर राहिल्या आहेत.
भारताकडून एसबीआय प्रमुख अरूंधती भट्टाचार्य यांना 25व्या, आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांना 40व्या, बायोकॉन लिमिटेडच्या प्रमुख किरण मजूमदार शॉ यांना 77व्या आणि शोभना भरतिया या 93व्या स्थानावर आहेत. तसेच भारतीय वंशाच्या इंदिरा नूयी या यादीत 14व्या स्थानावर आहेत. फोर्ब्स दरवर्षी राजकारण, बिझनेस, फायनान्स, टेक्नॉलॉजी, समाजकार्य, मिडिया यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील शक्तीशाली महिलांची यादी जाहीर करतात. यावर्षी या यादीत 20 नव्या महिलांची एन्ट्री झाली आहे. त्यात सर्वात जास्त चीनच्या महिलांचा समावेश आहे.