राहुल करणार राष्ट्रीय सल्लागार समितीची पुनर्रचना
नवी दिल्ली, दि. 07 - विविध निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागलेल्या काँग्रेस पक्षाला नव्याने उभारे देण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सल्लागार समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेवर असताना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय सल्लागार समितीची स्थापना केली होती. त्यामध्ये राजकीय क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच उद्योगपती, अर्थतज्ज्ञ, राजकीय विश्लेषक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होता. मात्र या समितीच्या ‘सल्ल्या’च्या अंमलबजावणीची ‘सक्ती’ आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन
सिंग यांचा ‘आज्ञाधारकपणा’ यामुळे समितीला ‘प्रती सरकार’ समजले जाऊ लागले. या कारणाने त्यावर टीकाही मोठ्या प्रमाणावर झाली.
आता मात्र सत्ता गमावल्यानंतर पक्षाला ‘सामूहिक नेतृत्व’ प्रदान करण्यासाठी ही समिती काम करेल; असे राहुल यांनी सूचित केले आहे. या नव्या समितीमधील 10 सदस्यांची घोषणा शनिवारी राज्यसभेच्या 54 जागांसाठी निवडणूक पार पडल्यानंतर करण्यात येणार आहे.