जिल्हा स्तरीय लोकशाही दिनात 4 अर्ज प्राप्त
सातारा, दि. 7 (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सातारा जिल्ह्यातील जनतेकडून 4 तक्रारी प्राप्त झाल्या. लोकशाही दिनातील प्राप्त तक्रारींचा एक महिन्यात निपटारा करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांनी सर्व अधिकार्यांना दिले.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये जनतेकडून प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींमध्ये जिल्हा परिषद-1, एसटी महामंडळ-1, महावितरण-1 आणि पोलीस विभागाकडील- 1 अशा एकूण 4 तक्रार अर्जांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनास अपर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा उपनिबंधक महेश कदम, जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय अस्वले, तहसीलदार चंद्रशेखर सानप उपस्थित होते.