कडबाकुट्टी यंत्रासाठी 10 जूनपर्यंत अर्ज करावेत
सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र वाटप करण्यात येणार असून इच्छुक शेतकर्यांनी अर्ज भरुन पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे 10 जूनपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी केले आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 2 एचपी क्षमतेची 50 टक्के अनुदानावर विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र वाटप योजना सातारा जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जाचा नमुना व मार्गदर्शक सूचना, अटी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध केलेले आहेत. अनुसूचित जाती, जमातीतील तसेच महिला पशुपालकांकडे किमान 5 पशुधन असणे व इतर, खुल्या प्रवर्गातील पशुपालकांकडे 5 च्या वर पशुधन आवश्यक आहे. इच्छुक व पात्र शेतकर्यांनी त्यांचे अर्ज परिपूर्ण भरून पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे दि. 10 जूनपर्यंत सादर करावेत.
यापूर्वी या योजनेकरीता पशुपालकाने अर्ज केला आहे, त्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. तथापी यापूर्वी अर्ज सादर केलेल्या पशुपालकांना योजनेचा लाभ नको असल्यास तसे त्यांनी लेखी स्वरुपात 10 जून पूर्वी पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकार्यांना (विस्तार) कळवावे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेंतर्गत कडबाकुट्टी यंत्राकरीता अनुदानाचा लाभ घेतलेल्या लाभार्थी पशुपालकास या योजनेतून पुन्हा लाभ घेता येणार नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी सांगितले आहे.