राज्य सरकारने केल्या 16 सनदी अधिका-यांच्या बदल्या
मुंबई, दि. 01 - 16 वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या असून महसूल व वन विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी)
संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे सीईओ डॉ. प्रदिप व्यास यांची राष्ट्रीय आरोग्य योजना, मुंबईच्या आयुक्त व संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामविकास व पाणीपुरवठा विभागाचे सचिव पी. के. देशमुख यांची कोकण विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी. आर. जाधव यांची मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आर. डी. देवकर यांची पुण्याच्या अपंग पुनर्वसन आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. कृषि आयुक्त पुणे व्ही. व्ही. देशमुख यांची मंत्रालयातील ग्रामविकास व पाणीपुरवठा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एन. के. पोयम यांची पुण्याच्या टीआरटीआयच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.दीपक म्हैसेकर यांची एनआयटी, नागपूरच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर के. डी. निंबाळकर यांना ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंग यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एन. ए. गुंडे यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. आर. व्ही. गामे यांची राज्य बियाणे महामंडळ, अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बी. जी. पवार यांची मंत्रालयातील गृहनिर्माण विभागाच्या सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे.के. बी. उमाप यांची पुण्याच्या पशुसंवर्धन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ए. पी. विधाले यांची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.