Breaking News

महापुरूषांचा अवमान किशोर पाटीलला अभय बहुजनद्वेषातून की बिंग फुटण्याच्या भितीने?

महाराष्ट्राचा बहुजन समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 01 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अवघ्या महापुरूषांचा घोर अवमान करणारे कार्यकारी अभियंते किशोर पाटील  यांना अभय देण्यामागे बहुजनद्वेष कारणीभूत आहे की त्यांच्या धमकीने साबांसचिव गर्भगळीत झालेत? असा सवाल आता जागे झालेले बहुजन विचारू लागले  आहेत. दरम्यान किशोर पाटील यांच्यावर महापुरूषांच्या अवमानप्रकरणी कारवाई व्हावी म्हणून महाराष्ट्रातील विविध बहुजन संघटना रस्त्यावर उतरण्याची तयारी  करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दै. लोकमंथनने गेल्या दोन दिवसांपासूनमुंबई रस्ते विकास संकल्प चित्र विभागातील महापुरूषांच्या तैलचित्राचा अवमान प्रकरण धसास लावण्यासाठी लेखमाला  सुरू केल्यानंतर बहुजन समाज खडबडून जागा झाला असून अवमान प्रकरणाचा कर्ता कार्यकारी अभियंता याची तारांबळ उडाली आहे. स्वतःचा बचाव  करण्यासाठी शासन प्रशासनातील उच्चपदस्थांना धमकाविण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरू केले आहेत.
महाराष्ट्रात सध्या भाजपाचे सरकार आहे. या सरकारमध्ये बहुजनांना स्थान मिळाले असले तरी कारभार मात्र संघाच्या विचारसरणीवरच सुरू आहे. त्याचाच एक  भाग म्हणून प्रशासकीय नाडीही ब्राम्हण उच्चपदस्थांच्या हातात आहे. त्याचाच फायदा घेऊन किशोर पाटील यांच्यासारखे प्रशासकीय अधिकारी महापुरूषांचा  अवमान करण्यास धजावत असल्याची भावना बहुजनांमध्ये व्यक्त केली जात आहे. दरम्यान, किशोर पाटील यांनी बहुजनांचा अवमान केल्याने ही मंडळी  जाणीवपूर्वक कारवाई टाळत नसावी ना? अशी शंका बहुजन समाजातून व्यक्त केली जात आहे.
बहुजन समाजाला प्रभावहीन करण्यासाठी नाना युक्त्या वापरण्याचे तंत्र जुनेच आहे. या तंत्रात किशोर पाटील सारक्या पिलावळीाच्या अनेक पिढ्यांचा वापर  या  मनुप्रवृत्तीने केल्याचा इतिहास आहे. सध्या गाजत असलेल्या महापुरूष अवमान प्रकरणाकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष त्याच षडयंत्राचा एक भाग असल्याची चर्चा  बहुजनांमध्ये सुरू आहे. दरम्यान, किशोर पाटील यांनी वरिष्ठांचे अनेक लफडे बाहेर काढण्याचीही धमकी दिल्याची चर्चा आहे. भुजबळांच्या तालमीत तयार झालेला  हा कार्यकारी अभियंता सचिव पातळीवर अधिकार्‍यांनाही ब्लॅकमेल करीत असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. म्हणूच किशोर पाटील विरूध्द कारवाई  करण्याचे धाडस केले जात नाही असा आरोप केला जातो आहे. किशोर पाटील विरूध्द प्रशासन आणि शासन स्तरावर कारवाई होत नसल्यामुळे बहुजन  समाजातून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नजिकच्या काळात किशोर पाटील विरूध्द कारवाई झाली नाही तर नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, मुंबई,  ठाणे, उस्मानाबाद, नागपूर अशा महाराष्ट्रातून ठिकठिकाणी बहुजन रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला जात आहे.
विधानसभा सभापतींनाही लावला चुना
साबांतील भुजबळ प्रवृत्तीची पिलावळ किती गेंड्याच्या कातडीची आहे. किंबहुना त्यांची कातडी गेंड्यापेक्षाही टणक असल्याचा अनुभव दस्तुरखुद्द  विधानसभा सभापती हरिभाई बागडे यांच्या मतदार संघातही येत आहे. औरंगाबाद साबां प्रादेशिक विभागातील कार्यसंहिता आणि प्रशासकीय नियम धाब्यावर  बसवून कोट्यवधींची हेराफेरी सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी (फुलंब्री) यांच्या इशार्‍यावर कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर  यांनी प्लॅन-नॉन प्लॅनची तब्बल 90 कोटीची (लेखाशिर्ष 5054/03 - 5054/04, नाबार्ड व रस्त्याची डागडुजी म्हणजे खड्डे भरणे) देयके मार्च अखेरपर्यंत अदा  केली, तर पश्‍चिम विभागात शेंडे यांनी याच प्रकारातील 50 कोटींची बिले अदा करून साबांला शेंडी लावली आहे. यासंदर्भात भाजप, संघ परिवारातील काही  जाणकारांसह सामाजिक कार्यकर्ते परमेश्‍वर नलावडे यांची सविस्तर मुलाखत उद्याच्या अंकात-
विशेष ः फुलब्री उपविभागात सर्व्हेची कामे मजूर संस्थाच्या नावे तुकडे पाडून (स्पिलटप) करण्यात आले. मा. मुख्यमंत्री व सेवानिवृत्त अतिरिक्त साबां. सचिव  श्री.आनंद कुलकर्णी यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाऊलं उचलून एक वेगळा पायंडा पाडण्याचे दृष्टीने मोठ्या कामाचे व एकाच कामाचे तुकडे (स्पिलटप) करू नये  असा आदेश काढला होता. परंतु फुलब्री उपविभागात सर्वेच्या कामाचे तुकडे पाडण्यात आले. औरंगाबाद मंडळ अंतर्गत तात्कालिन कार्यकारी अभियंता श्री.पी.के.  पाटील यांनी कामाचे (स्पिलटप) केल्यामुळे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने राज्य शासनाला श्री.पी.के पाटील यांचेवर  कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु राज्य शासनाने (माजी मंत्री इडीग्रस्त) भुजबळांनी भ्रष्टाचाराला साथ दिल्याने श्री.पी.के. पाटील यांचेवर आज तगायत  कार्यवाही करण्यात आलेली नाही. हे सरकारची नामुष्की नाही तर काय सा.बां. सचिवांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.