तहसिल कार्यालयासमोर तलाठ्यांचे निदर्शने
परभणी, दि. 18 - तलाठी, मंडळ अधिकार्यांना पायाभूत प्रशिक्षण द्यावे, अवैध गौण खनिज वसुलीच्या कामातून तलाठयांना वगळावे, यासह अन्य मागण्यांसाठी 16एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्ये परभणी जिल्हा तलाठी संघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी 11ते 26 एप्रिल या काळात राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून ही निदर्शने करण्यात आली. जेवणाच्या सुटीत हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात तलाठी, मंडळ अधिकारी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल. एन. काजे, तालुकाध्यक्ष जीवन कुलकर्णी, अभय मस्के, प्रदीप पेंडलवार, विशाल शिंदे, वाळवंटे, काकडे, शेख अन्वर, शबाना, बिदे, गुरले, फुटाणे, गाढे, धनंजय टेकाळे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.