गंगाखेड आगाराचा सावळा गोंधळ
गंगाखेड, दि. 18 - गंगाखेड आगाराचा सावळा गोंधळ थांबता थांबेना यांचा प्रत्यय पुन्हा आज घडला गंगाखेड बस स्थानकावतून नोंदेड येथे जाणार्या बस वाहकांची तिकीट मशीन मध्ये घोळ असल्याने प्रवाशांना देण्यात येणारे तिकीत चुकीचे जात असल्याने बस परत गंगाखेड स्थानकात आनावी लागली याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.
गंगाखेड आगार मशीन एक वर्षापासून सावळा गांधळाचया चक्रव्यूवाहामध्ये सापडलेली असून बेजबाबदार अधिकार्यांचा कामकाजामूळे गांगखेड आगार हे कायमच वादग्रस्त ठरत आहे. दोन दिवसापूर्वीच कर्तव्यदक्ष एसटी कर्मचार्यांच्या दक्षतेमुळे रॉकेल घोटाळा समोर आला आहे. तसेच कातकडे यांचा राजीनमा प्रकरण आतपर्यंत चर्चेचा विषय आहे. त्यात पुन्हा दि.16 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता गंगाखेड बस स्थनकातून गंगाखेड आगाराची परळी -नांदेड बस क्र.एमएच 20- डी 2958 बस नांदेड येथे निघाली असता वाहक प्रवाशांना तिकीट देत असताना प्रत्येक बस स्टॉपचे तिकीट जादा किंमतीचे मशीन मधून येत होते. मात्र, यावेळी दररोज प्रवास करणारे प्रवासी असल्याने त्यांनी जादा दराने मिळालेली तिकीटे नाकारली. त्यांनी तिकीट न घेता बसमधून खाली उतरणे पसंत केले.या प्रकाणामुळे मोठा गोंधळ उडाला यावेळी प्रवासी व कंडक्टर यांच्यात वाद विकोपाला गेले. मशीनमध्ये चुकीच्या अंतराचे नियंत्रण झाल्याने हा घोळ झाला असल्याचे दिसते. वाहकांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी 10 की.मी.अंतरावरुन गाडी पुन्हा आगारात आणली. यानंतर मशिनमधील प्रॉब्लेक काढण्यात आला यातुन नाहक प्रवाशांना एक ते सव्वा तसा उशिर झाला होता. गंगाखेड आगारातील मशिनमुळे घोळ झाल्याने याचा मनस्ताप प्रवाशांना निमुटपणे सहन करावा लागतो.
