दलित ऐक्यासाठी चार पावले मागे येण्याची तयारी : खा. आठवले
सातारा, दि. 17 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने गटागटात विभागलेल्या रिपब्लिकन पक्षात ऐक्य होणार असेल तर त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे. आपला गट सर्वात मोठा असला तरीही रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, अशी ग्वाही रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून खा. रामदास आठवले यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलेली समता रथ यात्रा सातारा येथे पोहोचली. त्यावेळी ते शासकिय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर तपासे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आण्णा वायदंडे, महेंद्र शिर्के, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शहाजी कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खा. आठवले म्हणाले, 26 जानेवारी 2016 ला भारत भीमयात्रेला सुरुवात केली. 29 राज्यांतून सुमारे 25 हजार किमीचा प्रवास करून ही यात्रा सातार्यात दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची वाटचाल संविधानाला अनुसरून अशीच आहे. मोदी घटना बदलू पाहत आहेत, संविधानात हवे तसे बदल करू इच्छित आहेत, असे कुणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. काँग्रेसच त्या दृष्टीने अपप्रचार करत असल्याचे सांगून आठवले म्हणाले, काँग्रेसला यापूर्वी अनेकदा मदत केली, राष्ट्रवादी, भाजपालाही मदत केली. मात्र, सत्तेत वाटा मिळाला नाही. सत्तेत सक्षम वाटा मिळायचा असेल तर स्वबळावर लढले पाहिजे. त्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी राखीव जागांव्यतिरिक्तइतर जागांवर दलितेतरांना पाठबळ दिले पाहिजे, तरच भविष्यात सत्तेत चांगला वाटा मिळेल. मुंबई महापालिका स्वबळावर लढविण्याचा प्रयत्नकरणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना खा. आठवले म्हणाले, मुंबई महापालिकेसाठी आपण सेना-भाजप युतीसाठी प्रयत्न करणार आहोत. सेना-भाजपबरोबर 90 टक्के येणार नाही याची आपल्याला खात्री आहे. मात्र, आपण महापालिकेसाठी स्वबळावर न लढता भाजपसोबत राहणार आहोत. जातिव्यवस्था कमी झाली आहे. मात्र, ती संपली आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. जातिव्यवस्था गाडून टाकायची असेल तर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्या जिल्ह्यात सर्वाधिक आंतरजातीय विवाह होतील त्या जिल्ह्याला 5 कोटींचा विकास निधी द्यावा तसेच आंतरजातीय लग्न करणार्या दाम्पत्याला 5 लाख रुपये आणि दोघांपैकी एकाला सरकारी नोकरी द्यावी, असे आपण शासनाला सुचविले आहे. असे झाले तर जातिव्यवस्था नाहीशी होईल.
रोहित वेमुल्ला प्रकरणी हैदराबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चॅन्सलर आप्पाराव यांना निलंबित करावे, या मागणीवर आपण ठाम असल्याचेही खा. आठवले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरार्थ सांगितले.