Breaking News

मनपा निवडणूकीत भाजप, काँग्रेसचे उमेदवार विजयी

औरंगाबाद


, दि. 18 - सातारा-देवळाई भागातील औरंगाबाद महापालिकेच्या दोन वॉर्डांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत.
शिवसेनेला दोन्ही जागी विजय संपादन करण्यात अपयश आले. वॉर्ड क्रमांक 114 मधून भाजपचे अप्पासाहेब हिवाळे विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके उडविण्यात आले. वॉर्ड क्रमांक 115 ची जागा काँग्रेसच्या सायली जमादार यांनी जिंकली. त्यांनी नजिकच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या पल्लवी गायकवाड यांचा पराभव केला. सातारा-देवळाई परिसराचा औरंगाबाद महापालिकेत अलिकडेच समावेश करण्यात आला आहे. तिथल्या दोन वॉर्डांसाठी रविवारी (ता. 17) मतदान झाले होते.