शेळी पालनातून लाखोंचे हमखास उत्पन्न
कराड, दि. 17 - तालुक्यातील वाघेरी येथील काळुबाई कृषीकन्या गोट फार्मच्या माध्यमातून अरुण कचरे हे शेळी पालन, सेंद्रीय शेती आणि गांडूळ खत याच्या माध्यमातून महिन्याला हमखास लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी व रविवारी शेतकर्यांना प्रशिक्षण देवून या व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.
काळुबाईच्या नावानं चांगभलं, बळीराजाच राज्य येवू दे आदी मराठी चित्रपट आणि कुणाल म्युझीक कॅसेटच्या माध्यमातून स्वत:ची ओळख असणारे कचरे गेल्या 6 वर्षांपासून वाघेरीच्या माळावर काळुबाई कृषीकन्या गोट फार्मच्या माध्यमातून शास्त्रोक्त पध्दतीने शेळी पालन करत आहेत. प्रारंभी पाच शेळ्या व एक बोकड अशी सुरुवात केली होती. नंतर 25 शेळ्या त्यांनी आणल्या सध्या 100 शेळ्या, 110 बोकड इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवसायाची वाढ केली आहे.
या शेळ्यांना लसून घास, मका, कडवळ, मारवेली गवत, शेवळी, तुती, कडू लिंब, काटेरी पाला असा हिरवा चारा तर द्विदल धान्याचे भुस्कट, हरभरा, मटकी, मुग, चवळी, सोयाबीन, भुईमुग वेल, शाळू, डोंगर माथ्यावरचं गवत यामध्ये मिट घालून हा सुका चारा ते देतात. हवामान, तापमान यावर आधारित ते ओला आणि सुका चार्याचे प्रमाण ठरवतात. एक शेळी दिड वर्षात आपल्या चार पिलांसह एक ट्रॉली लेंडी खत देते. याच पाच जनावरांपासून 30 टन वार्षीक गांडूळ खत आणि 1200 ते 1500 लिटर व्हर्मी वॉश मिळते, असे कचरे यांनी सांगितले. शेळी पालन व्यवसायात 18 महिन्यात लाखाला लाख रुपये नफा राहतो, असेही ते म्हणतात.
सध्या या फार्ममध्ये सिरोही, सौजत, उस्मानाबादी आणि देशी शेळ्या आहेत. या विषयी माहिती देताना कचरे म्हणतात, सर्वात जास्त उत्पन्न देणारी, फायदा देणारी आपली देशी शेळी असून शेतकर्यांनी देशी शेळी पालनाकडे जास्तीत जास्त भर द्यावा. गांडूळ खत मोठ्या प्रमाणात विक्रीला जाते. त्या शिवाय स्वत:च्या शेतामध्ये उपयोगात येते. गांडूळ खतापासून मिळणारे व्हर्मीवॉश हे पिकांसाठी टॉनिक म्हणून वापरले जाते. शास्त्रोक्त पध्दतीने हवामानावर आधारित लसीकरण आणि चार्याचे व्यवस्थापन केल्यास शेळी पालनातून हमखास लाखोंचे उत्पादन मिळू शकते.
व्हर्मी वॉश : गायी, शेळी यांचे मुत्र एका टाकीत जमा केले जाते. हे मुत्र तयार करण्यात आलेल्या गांडूळ खतावर फवारले जाते. त्याचबरोबर यामधून काही प्रमाणात पाणीही फवारले जाते. या गांडूळ खताच्या बेडपासून पाझरुन येणारा द्रव पदार्थ एका छोट्याशा टाकीमध्ये जमा होतो. यालाच व्हर्मी वॉश म्हणतात. हे व्हर्मी वॉश पिकांच्या वाढीसाठी टॉनिक ठरले आहे, अशी माहिती कचरे यांनी दिली.
सेंद्रीय कीटकनाशक : देशी गायी, शेळी यांचे एकत्रित केलेले 10 लिटर मुत्र त्यामध्ये कडू लिंब, करंज, एरंड, रुई, निरगुडी, निलगीर, सीताफळ, रामफळ, करवंद, जांभूळ, पपई आणि शिकेकाई या प्रत्येक वनस्पतींची मूठभर पाने आणि मूठभर बिया एकत्र करुन त्याची कुजवन करायची. 40 ते 45 दिवस हे सर्व बंदिस्त ठेवायचे. त्यानंतर निर्माण होणारा अर्क प्रत्येकी 10 लिटर पाण्यात 500 मिलिलीटर टाकून पिकांवर कीटकनाशक म्हणून फवारायचे. या कीटकनाशकाचा जमिनीचा पोत वाढविणे आणि कीडीचे उच्चाटन करण्यासाठी निश्चितपणे फायदा होत असल्याचे कचरे म्हणाले.