कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी संस्थेशी बांधिलकी ठेवावी : भोसले
भुईंज, दि. 17 - कारखानाने कार्यक्षेत्रातील ऊसाच्या उत्पादनात भरघोस वाढ होण्यासाठी ऊस विकासाच्या अनेक योजना राबविल्या, सवलतीत ऊस बियाणे, खते यांचा पुरवठा केल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. क्षणिक लोभापाई शेतकर्यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांकडे वळविल्यामुळे किसन वीर आणि प्रतापगड कारखान्यास गाळपाचे उद्दिष्ठ गाठता आले नाही. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी संस्थेशी बांधिलकी ठेऊन पुढील हंगामात आपल्याच कारखान्यास ऊस घालावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केली. दरम्यान, कारखान्याने या गळीत हंगामात 7 लाख 6 हजार 143 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून सरासरी 11.43 टक्केसाखर उतार्याने 8 लाख 6 हजार 380 क्िंवटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2015-16 च्या 45 व्या गळित हंगामाची सांगता भुईंज येथील प्रगतशील शेतकरी श्री. व सौ. अंजना राजेंद्र गायकवाड आणि कारखान्यातील कर्मचारी श्री. व सौ. जयश्री मदन चव्हाण (को-जन), श्री. व सौ. जयश्री अमोल बाबर (इंजिनिअरींग), श्री. व सौ. सोनम सागर कदम (उत्पादन), श्री. व सौ. भारती रामचंद्र मिसाळ (शेती) या उभयतांच्या शुभहस्ते गव्हाणीचे विधीवत पुजन करून झाली. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, सौ. राजश्री गजानन बाबर व संचालक उपस्थित होते.
भोसलेे म्हणाले, गळीत हंगामात नवे प्रश्न, नवी आव्हाने येतात. यंदाच्या हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागला. किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने गेल्या 12 वर्षात ऊस तोडीत राजकारण केले नाही. मात्र, या हंगामात विरोधकांनी शेजारच्या कारखान्यांची दिशाभूल करून आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस तिकडे वळविला. हा हंगाम कारखान्याशी संबंधित सर्व घटकांच्या सांघिक प्रयत्नातून यशस्वी झाल्याचे नमूद करून मदन भोसले यांनी पुढील हंगामात तिन्ही कारखान्यात मिळून सोळा लाख टन ऊस गळीत करण्यासाठी कारखान्याच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्यांनी आतापासून कामाला लागण्याचे आवाहन भोसले यांनी केले.
सन 1972 पेक्षाही तीव्र दुष्काळ यंदा महाराष्ट्र अनुभवत असून त्या पार्श्वभूमीवर पुढील गळीत हंगाम सर्वांची परिक्षा पाहणारा आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी आतापासून तयारी ठेवण्याची गरज असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी सांगितले. संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन दत्तात्रय शेवते यांनी केले. आभार चंद्रकांत इंगवले यांनी मानले.