Breaking News

आरएसएसची तुलना मुस्लिम लीगशी

लखनऊ, दि. 18 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) जातीय द्वेष पसरवत असून फुटीरतावादी राजकारण करत असल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेत्या मोहसीना किडवाई यांनी केला आहे. मोहसीना किडवाई यांनी आरएसएसची तुलना मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लिम लीगशी केली आहे. मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लिम लीगमुळे 1947मध्ये भारताची फाळणी झाली, तर आरएसएस जातीय द्वेषाच्या आधारे देशाची फाळणी करत आहे, असे मोहसीना किड
वाई यांनी म्हटले आहे.