Breaking News

गांजाची तस्करी करणार्‍या युवकास अटक

कराड, दि. 19 -  गांजाची वाहतूक करणार्‍या तरूणाला एसटी सुरक्षा रक्षकाच्या तत्पर्तेमुळे  पकडण्यात आले. कुर्डवाडी-कराड एसटी बसमधून गांजा नेणार्‍
या कुणाल प्रकाश लोखंडे (रा. ठाणे) या तरूणाचा हा कारभार कराड बसस्थानकात उघडकीस आला. त्याच्याकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आला. हा युवक गांजा घेऊन ठाण्याला निघाला होता. 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुणाल लोखंडे खानापूर, जि. सांगली येथून कुर्डवाडी-कराड एसटीने प्रवास करत होता. त्याच्याकडे असणार्‍या बॅगेत दहा किलो गांजा होता. एसटी विटा बसस्थानकावर आल्यानंतर लोखंडे एसटीमधून काहीकाळ खाली उतरला. त्याचवेळी एसटी कराडकडे रवाना झाल्याने लोखंडे तेथेच राहिला. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लोखंडे कराड बसस्थानकावर आला. त्याने बसस्थानकातील सुरक्षा रक्षक एन. डी. सावंत यांच्याकडे एसटीमध्ये राहिलेल्या आपल्या बॅगबाबत विचारपूस केली. त्यानंतर बॅगमध्ये काय आहे अशी विचारणा सावंत यांनी केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने सावंत यांनी लोखंडे याला बॅग उघडून दाखविण्यास सांगितले. त्यावेळी बॅगमध्ये गांजा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सावंत यांनी पोलिसांना माहिती दिल्लीनंतर लोखंडे याला ताब्यात घेत गांजा जप्त केला.