पुसेगाव येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्याची ग्रामपंचायतीची मागणी
सातारा, दि. 19 - येथील सातारा-पंढरपूर राज्य महामार्गावरील गावांतर्गत रस्त्याचे रुंदीकरण करुन रस्त्याच्या दुतर्फा गटर बांधकाम करण्याची मागणी पुसेगाव ग्रामपंचायतीने केली आहे. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यादव यांना दिलेे.
पुसेगाव हे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राचे गाव असून खटाव तालुक्यातील महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव आहे. गावाचा विस्तार सातारा-पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा वाढत असल्याने या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी हा नित्याचा प्रकार आहे. परिणामी या रस्त्याने मार्गक्रमण करणार्या व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका तहसीलदारांसमोर मांडली होती. या घटनेस दोन महिने लोटले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. संबंधित विभागाने या कामासाठी भरीव निधीची तरतूद केली असली तरी कृती करण्याकडे डोळेझाक केली जात आहे. या रस्त्याच्या कामाचे गांभीर्य आणि लोकांची गरज लक्षात घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अप्पर जिल्हाधिकारी यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले. यावेळी उपसरपंच रणधीर जाधव, भरत मुळे, प्रकाश जाधव, प्रा. केशव जधव, संदीप जाधव, राजेंद्र देशमुख, जीवन जाधव, आबासाहेब खराटे उपस्थित होते.