दामोदर ने खवय्यांची मने जिंकली ः आ.जगताप
अहमनगर, दि. 21- दहा वर्षापासून शहरातील खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व तृप्त करणारे दामोदर बिर्याणी हाऊसच्या स्वादिष्ट जेवणाच्या होम डिलिव्हरी सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.19 एप्रिल रोजी आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अभिषेक कळमकर तर यावेळी नगरसेवक अनिल बोरुडे, अविनाश घुले, अंबादास पंधाडे, संचालक राजेंद्र ससे, महेश काळे, अर्जुन कडूस, संजय गायकवाड, अरुण जाधव, डॉ.अविनाश मोरे, विरेंद्र ओबेरॉय, अभय गुजराथी, गणेश ससे, सचिन जगताप, हेमंत रासने, अजय दीघे, अनिल कराळे, रामदास वाघ आदी उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, दर्जेदार, स्वादिष्ट जेवणाने दामोदर बिर्याणीने खवय्यांची मने जिंकून अल्पावधीत नावलौकिक मिळवला आहे. विदेशी खाद्य पदार्थ कंपन्या घरपोहच सेवा देत असताना, दामोदर हाऊसच्या वतीने सुरु करण्यात आलेली सेवा प्रशंसनीय आहे. हॉटेल पर्यंत न पोहचू शकणार्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
महापौर अभिषेक कळमकर यांनी धावत्या युगात फास्ट सर्व्हिसचा जमाना आला आहे. नागरिकांना घर बसल्या इंटरनेटच्या माध्यमातून शॉपिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर आता घर पोहच जेवणाची सुविधा मिळत असेल तर याचा लाभ नागरिक निश्चितच घेणार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात राजेंद्र ससे म्हणाले की, दामोदर बिर्याणी हाऊसची सेवा हॉटेल पुरती मर्यादित न राहता त्याची चव घर बसल्या नागरिकांना चाखता येणार आहे. अचानक घरी आलेले पाहुणे, घरगुती समारंभ व लहान मोठ्या पार्टीसाठी दामोदर बिर्याणीची होम डिलिव्हरी सेवा पर्वणी ठरणार आहे. नगरमध्ये प्रथमच बिर्याणी, चाप कबाब, चिकन, आचारी कबाब, पनीर आचारी, कबाब, चिकन लालपरी, मटन लालपरी, फिश मालवणी, खेकडा, ओले बोंबील आदी विविध मांसाहरी व शाकाहरीचे पदार्थ एका फोनवर घरपोहच मिळणार असल्याचे सांगून, नागरिकांच्या आग्रहास्तव तालुकास्तरावर शाखा (फ्रॅन्चाइसी) सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.