Breaking News

महसूल कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

प्रशासकीय कामाकाज विस्कळीत ; 1 मे ला मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा 

अहमदनगर, दि. 21 - महसुल कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज जिल्हा महसुल कर्मचारी संघटना तसेच तलाठ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्य  तलाठी संघाच्या जिल्हा शाखेने बुधवारी दि.20 रोजी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय दनाणून सोडले होते. आंदोलकांनी संपूर्ण परिसर गजबलेला दिसत होता.  आंदोलनात सर्व महसुल कर्मचारी तसेच तलाठी सहभागी झाले झाल्याने संपूर्ण जिल्हाभरातील प्रशासकीय कामाकाज विस्कळीत झाले असल्याचे चित्र कार्यालयात दिसत  होते.
तसेच शासनाने मागण्या मान्य न केल्यास पुढील महिन्यात 1 मे रोजी मंत्रालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. महसुल कर्मचारी  संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, सरचिटणीस विजय धोत्रे, कार्याध्यक्ष कैलास साळुंके यांच्या नेत्रृत्वाखाली हे आंदोलन सुरु करण्यात  आले आहे. महसुल कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेने वेळोवेळी शासनाकडे पाठपुरवा केला होता. त्यामुळे 24 जुलै 2014 रोजी महसुल मंत्र्यांसमवेत तर 6  जुलै 2014 रोजी उपमुख्यमंत्री व अधिकार्‍यांच्या बैठकीत मागण्या मान्य करण्यात आल्या व त्यासंदर्भात लवकरच शासन निर्णय काढण्यात येतील असे सांगण्यात आले  होते.
 परंतु 2 वर्ष उलटली तरी अद्यापही शासन निर्णय काढण्यात न आल्याने महसुल कर्मचार्‍यांनी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास 1 मे  रोजी मोठ्या प्रमाणात मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.